सातारा दि: पर्यटनाची पंढरी असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाचगणी महाबळेश्वरच्या दळणवळणाचे साधन असणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहेत यामुळे सुमारे दोन दिवसात 300 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान झाले आहे हे नुकसान अधिक होऊ नये यासाठी सुरूर पाचगणी पोलादपूर रस्ता त्वरित पूर्ण करावा असे निवेदन माहिती अधिकाराच्या पुस्तकाचे लेखक व उद्योजक डॉक्टर विजय दिघे यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे दरम्यान याबाबत गांभीर्याने लक्ष न दिल्यास कोल्हापूर खंडपीठाकडे जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आर.टी.आय. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय दिघे यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सुरूर – पाचगणी – पोलादपूर हा रस्ता मागील सुमारे दीड वर्ष वर्षांपासून अपूर्ण व रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सदर रस्त्यावर चालू असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण होत आहे . वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच वाहतुकीच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागास आदेश द्यावेत.
सदर काम कोणत्या ठेकेदारास देण्यात आले आहे याची माहिती सार्वजनिक करावी.
कामाचा मंजूर कालावधी, खर्च व कामाचे स्वरूप जाहीर करावे.
रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नियमित पाणी मारण्याची व इतर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत.
तसेच जर या बाबत प्रशासनाकडून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही तर नागरिकांच्या हितासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथे जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असाही इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा व रायगड जिल्हा , महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहेत. दरम्यान, सदरच्या कामामुळे होणारे विलंब हा थंड हवेचे ठिकाण असल्या पाचगणी -महाबळेश्वर मधील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांसाठी खूप मोठे संकट उभे राहिले आहे. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे त्याची आम्ही स्वागत करतो. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. हा श्रेय वादाचा प्रश्न नसून स्थानिक भूमिपुत्र व पर्यटकांचे जीवन मरणाचा प्रश्न आहे .असे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान , आरटीआय ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय दिघे यांनी सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. लवकरच या संदर्भातील महत्वपूर्ण बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
फोटो-- सुरूर पाचगणी पोलादपूर रस्त्या संदर्भात भूमिका मांडताना आरटीआय ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय दिघे

