प्राचार्या ॲड. सविता मुरुमकर विरांगणा सावित्रीबाई फुले नॅशनल फेलोशिप आवार्ड न्यु दिल्ली पुरस्काराने सन्मानीत.

 

सौ. सविता मुरुमकर 


(मुरूम प्रतिनिधी)

मुरुम येथील रहिवाशी प्राचार्या ॲड. सविता संभाजीराव मुरुमकर श्री करिबसवेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कासारसिरसी येथे कार्यरत आहेत.शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल "भारतीय साहित्य अकादमी न्यु दिल्ली" यांच्या वतीने 2025-26 चा विरांगणा सावित्रीबाई फुले फेलोशिप आवार्ड या अंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठीत बस्वरत्न पुरस्काराने सन्मानीत, प्रशालेतील अतुलनीय योगदानाबद्दल आदर्श प्राचार्या म्हणून सन्मानीत,कोवीड काळात कोरोनायौध्दा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. प्राचार्या मुरुमकर या संभाजीराजे सार्वजनिक वाचनलय मुरुम व आईश्री विनंता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुरुमच्या सचिव असून संस्थेच्या माध्यमातुन शैक्षणिक / सामाजिक/राष्ट्रीय कार्य करतात. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे मोफत वाचनालय चालवणे,संविधान जागर अंतर्गत संविधानाचे वाटप,प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थी गौरव,सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध,कोविड काळात गरजुंना धान्यकिट वाटप, डॉक्टर, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड पुरस्काराने सन्मानीत,मतदान जनजागृती

अंधश्रध्दा निर्मुलनात सक्रीय सहभाग,महिलांना कायदेविषयक सल्ले,पर्यावरण जनजागृती,व्यसनमुक्तीसाठी व्याख्याने/चर्चासत्रे,स्वच्छता अभियान राबवणे,बालसंगोपन/कुपोषण मुक्त मुले चर्चासत्र,पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाजउपयोगी कार्यक्रम ते राबवितात.मुरुमकर यांच्या सर्व पातळीवरील शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन त्याचा सन्मान होत आहेत. त्यांना मिळालेल्या सन्मानासाठी सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.