गोंदवले - माण तालुका परिसरात काल पहाटे मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे माण नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला यामुळे नदी कडेला असणाऱ्या गावा मध्ये असणारे बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत तर अनेक पूल पाण्याखाली गेलेत गोंदवले खुर्द मधून रानंद या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा पूल काल पाण्याखाली गेलेला होता या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजस्थान येथील गवंडी काम करणारे काही कामगार लोधवडेतील काम उरकून रानंद कडे जाण्यासाठी नदीच्या पुलावर आले उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी पाणी जास्त असल्याचे त्यांना सांगितलं मात्र त्यांनी त्या पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी आपली दुचाकी पाण्यात घातली आणि पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुचाकी वाहू लागली दुचाकी वरील तीन जणांना ग्रामस्थांनी शर्तीने प्रयत्न करून वाचविण्यात यश आलं मात्र त्यांची दुचाकी वाहून गेली आज सकाळी पाणी कमी झाल्यानंतर संबंधित लोकांनी त्या दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी पूलापासून काही अंतरावर पाण्याच्या मध्यभागी एका अडकलेली दिसली त्यांनी दोरखंडाच्या साह्याने पाण्यात उतरून ती दुचाकी व्यवस्थित रित्या बाहेर काढली पाण्यात वाहून गेल्यामुळे दुचाकीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असताना ग्रामस्थांनी निष्काळजीपणे पाण्यात जाऊ नये असे आवाहन दहिवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे
छाया - माणगंगा नदी पात्रातून दुचाकी काढताना युवक