राजु साप्तेच्या गुन्हेगाराना कठोर शासन होणे अत्यावश्यक!

 


राकेश मौर्य, गंगेश्वर श्रीवास्तव आदीसह राजकीय बापावर कारवाई व्हावी!

(शीतल करदेकर)


पुण्याची तील कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली! आत्महत्येआधी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून कलाकारांच्या समूहावर टाकला ते वाचून समुहा वरचे अनेकांनी सल्ले दिले, असं करू नको ,तसं करू नको मात्र अशावेळी पोलिसाच्या 100 नंबरला फोन करणे ,त्यावेळेस त्या व्यक्तीशी संपर्क  करणे अत्यावश्यक आहे व होते! तसे झाला नाही!  

मृत्यूआधी राजु साप्ते यानी लिहून ठेवलेल्या सात पानी पत्रात राकेश,मौर्य,गंगेश्वर श्रीवास्तव आदिची नावे आहेत, हे दोघे *फिल्मस्टुडियो सेटीग  अ‍ॅन्ड अलाईड मजदूर  युनियन*

 संघटनेचे पदाधिकारी आहेत त्याचे चेअरमन आ राम कदम आहेत !

गंगेश्वर श्रीवास्तव  हे खंडणीबहाद्दर , भाजपाचे वसई विरारचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे  जाहिरातीत दाखवतात ,त्यांची स्वत:ची  शक्ती ञनहित मंच ही संघटना आहे .त्यालाही भाजपाच्या मान्यवराचा आशीर्वाद आहे,असे सर्वत्र होणाऱ्या प्रचार प्रसारातील साहित्यातूनही दिसते!

संघटनांच्या नावाखाली संरक्षण हप्ता घेणे, मिळणाऱ्या कामाच्या पैशातून आपला हप्ता कापून घेणे,न दिल्यास त्या व्यक्तीचे काम थांबवणे, निर्मात्याना दमदाटी करून शुटिंग थांबवणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत! 

मात्र प्रचंड राजकीय कृपा असल्याने हातावर पोट असणारे तंत्रज्ञ,छोटे कलाकार याबाबत तक्रार करत नाहीत! 

या ग्लॅमरच्या क्षेत्रात सर्वच राजकीय पक्षांच्या  संघटना आहेत,वर्चस्वाची लडाई  इथेही असतेच! भरडले जातात ते इथले श्रमिक!  (कलाकार ते सर्ध तंत्रज्ञ) मूळात  या  भरपूर फायदेशीर  असणाऱ्या  या क्षेत्राला व श्रमिक कामगारांना सरकारचे संरक्षण मिलण्याची गरज आहे! याची असंघटित कामगार म्हणून  नोदणी होणे! कामाचे ठिकाणी व इतरत्र सुरक्षित वातावरण मिळणे, खंडणी व हप्तेबाजी कटप्रॅक्टिसवाल्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे, तसेच याना संरक्षण  देणाऱ्या राजकीय गुंड नेत्यांवरही कारवाई होणे अत्यावश्यक आहे!

राज् साप्तेने अशा प्रवृती विरोधात बलिदान दिले आहे! आर्थिक, मानसिक शोषण करणारे रक्तपिपासू किमान या महाराष्ट्रात नसावेत! महाराष्ट्रातील या उद्योगाला पोषक वातावरण मिळावे अशी मागणी सर्वत्र होते आहे!