महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडून जनतेला दिलासा द्यावा,एम आय एम चे माळशिरस तालुका अध्यक्ष सलमान शेख याची मागणी.


अकलूज... वार्ताहर..

महाराष्ट्रातील  धार्मिक स्थळे   उघडून जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी.  मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांच्या कडे
एम आय एम चे माळशिरस तालुका अध्यक्ष सलमान शेख यांनी निवेदनद्वारे केली आहे.


आपल्या भारतदेशातील जवळ जवळ सर्वच नागरिक धार्मिक प्रवृत्ती चे आहेत. सर्वाची आस्था आणि विश्वास मोठ्या प्रमाणावर देव, अल्लाह, गाँड, नानकसाहेब यांच्यावर आहे.
                    धार्मिक स्थळे बंद असल्याने बर्याच जनांना नैराश्य आलेले आहे. तसेच ,पुजारी, इमाम, फादर आदी व या धार्मिक स्थळांवर अवलंबून असणार्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
             "ज्या प्रमाणे महसुली साठी सरकारला दारू धंद्याची अवश्यकता आहे तसेच भावीकांना धर्म स्थळाची आवश्यकता आहे".

याचा गांभीर्याने विचार करून यावर त्वरित निर्णय ध्यावे व या करीता योग्य ती उपाय योजना करावी .
असे या निवेदनात म्हटले आहे.

२) मा. उपमुख्यमंत्री
३) मा. पालकमंत्री सोलापूर जिल्हा
४) तहसीलदार माळशिरस तालुका यांना या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आले आहेत.