म्हसवड-वार्ताहर-
माणदेशी रेडिओ सखी मंच वतीने
म्हसवड पोलीस ठाण्यातील पोलीसांना राखी बांधुन कृतज्ञता व्यक्त केली.
माणदेशी रेडिओ सखी मंच च्या वतीने म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधवांना सखी मंच च्या सदस्य व अध्यक्षा यांनी राखी बांधून सर्व पोलीस बांधवाना कोरोना काळात नागरिकांचे रक्षण करत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर म्हसवड येथील दोन घास सुखाचे हा उपक्रम लॉक डाऊन काळात यशस्वी रित्या राबवून गरजू लोकांना मोफत अन्न पुरवठा केल्याबद्दल कोरोना योद्धाचे राखी बांधून अभिनंदन केले. या कार्यक्रमात माणदेशी रेडिओ सखी मंच च्या अध्यक्षा सौं. चंदा माने, सौं मनिषा मोडासे, पल्लवी वेल्हाल, माणदेशी रेडिओ च्या निवेदिका सौं. लता जाधव, अमृता माने, आदी सदस्य उपस्थित होते.