शिखर शिंगणापुर :
माण तालुक्यातील मोही गावामधील असणारे श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्युनिअर काँलेजच्या शैक्षणिक दर्जा हा दरवर्षी वाढत आहे.आता नुकत्याच झालेल्या सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला आहे.
या निकालामध्ये कला शाखेचे तीनही क्रंमाक शिंगणापुर गावच्या ठोंबरेवाडीमधील कु.अनिता शिंगाडे , कु.वर्षा ठोंबरे व योगेश ठोंबरे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रंमाक पटकवला आहे.
तसेच वाणिज्य शाखेचे तीन क्रंमाक कु.आरती देवकर , कु.सिमा राऊत व कु.संजिवनी कोळेकर यांनी म्हसवड केंद्रात श्री महालक्ष्मी ज्युनिअर काँलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.त्यांनी मिळविलेल्या यशामागे श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्यु.काँलेजच्या प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग व शाळेचे संपूर्ण स्टापचे मोलाचे व मार्गदर्शनमुळे यश संपादन केले आहे.
श्री बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मोही या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवसह सदस्यानी मोही गावासह ग्रामीण भागातील मुला मुलीसाठी शालेय व्यासपीठ तयार केल्याने शिंगणापुर , मार्डी , खुटबाव, थदाळे सह आसपासच्या वाडीवस्तीच्या मुलांना शैक्षणिकचा उत्तम दर्जा मिळवण्याचे काम करण्याबरोबर दर्जेदार शिक्षण प्रणाली देण्याचे काम मोही गावाने केल्याने पंचक्रोशीत मोही गावच्या नावलौकिकात भर पडली आहे.
श्री बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ समिती व श्री महालक्ष्मी ज्युनिअर काँलेजच्या सर्व स्टापसह समस्त मोही गावच्यावतीने सर्व विद्यार्थी विद्यार्थीनीचे अभिनंदन करण्यात आले.
चौकट
वाणिज्य शाखेचा म्हसवड केंद्रात रेकार्ड
म्हसवड केंद्रात श्री महालक्ष्मी ज्युनिअर काँलेजने शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ पासून सलग तीन वेळा १००% निकाल लागला आहे. म्हसवड केंद्रात मोही गावच्या श्री महालक्ष्मी ज्यु . काँलेजने रेकार्ड ब्रेक असे यश संपादन केले.
शाळेच्या सर्व संचालक व शिक्षक वर्गाने केलेल्या परिश्रमाचे फलित मिळाले आहे. शैक्षणिक दर्जा वाढण्याबरोबर व्यक्तीमहत्व विकासाला प्राधान्य दिले जाते यांची ही पोचपावती आहे.