'इंदापूर' वर कोरोनाचे सावट हळूहळू गडद.
इंदापूर : प्रतिनिधी
आज सकाळी इंदापूर तालुक्यात ४ जण कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर शहरातील ठाकरगल्लीतील ५५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी पुण्यास दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले की, इंदापूर शहरातील २, तालुक्यातील जंक्शन १,पळसदेव१,बावडा १ अशा एकूण ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
इंदापूर तालुक्यात गेले काही दिवस दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.आजही दिवसभरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत.शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये आढळत असलेल्या रुग्णांमुळे इंदापूरवर कोरोनाचे सावट हळूहळू गडद होत चालले आहे. कोरोना रोखण्यासाठी इंदापूरात आणखी प्रभावी उपाययोजना हवी असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.