इंदापुरात तालुक्यात कोरोनाने केली शंभरी पार : तर आज १६ जण बाधित



भिगवण ३, वरकुटे खुर्द ९, मदनवाडी १, गोतोंडी १, निमगाव केतकी येथील २ असे १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.

इंदापूर : प्रतिनिधी (दि. २१)

      इंदापूर तालुक्यात दि. २१ जुलै रोजी प्राप्त १६ जणांचा कोरोना अहवाल कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्याने इंदापूर तालुक्याने कोरोना संसर्गाची शंभरी पार केली आहे. इंदापूर तालुक्यात कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ११२ झाली असून भिगवण येथील ३ संशयित अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सकाळी आलेल्या १३ पॉझिटिव्ह अहवालात दुपारी आणखी ३ जणांची भर पडल्याने हा आकडा १६ झाल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र सुरू झाल्यानंतर पहिले ७६ दिवस एक अपवाद वगळता तालुक्यात एकही रुग्ण नव्हता. मात्र शासनाने सर्वांना आपल्या मूळ गावी जाण्यास परवानगी दिल्या नंतर तालुक्यात संसर्ग सुरू झाला.
 दि. १५ जुलै रोजी तालुक्यात विक्रमी म्हणजे १५ रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ७६ जणांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.त्यापैकी १६ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये भिगवण ३, वरकुटे खुर्द ९, मदनवाडी १, गोतोंडी १, निमगाव केतकी येथील २ जणांना कोरोनाची लागण झाली माहिती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

====================================