धक्कादायक..इंदापूर शहरात दोन दिवसात दोघांच्या आत्महत्या ,


इंदापूर : प्रतिनिधी (दि.१२जुलै)

        इंदापूर शहरात दोन दिवसात दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना सोनाईनगरमध्ये घडली. ती शनिवारी उघडकीस आली. तर व्यंकटेशनगर घडलेली दुसरी घटना आज (दि.१२) सकाळी उघडकीस आली.
       सविस्तर हकीकत अशी की, सोनाईनगर भागातील प्रतिक सुरेश सोनी (वय २३ वर्षे) या युवकाने आपल्या रहात्या घरातील छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या संदर्भात त्याचा चुलतभाऊ निमेश जितेंद्र सोनी (रा.सिध्देश्वर मंदीर शेजारी, मेनरोड इंदापूर) याने इंदापूर पोलीस शनिवारी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात खबर दिली. या प्रकरणात मृतदेहाजवळ चिठ्ठी चपाटी अथवा इतर काही आढळून आलेले नाही. आत्महत्येचे कारण समजले नाही.

दुसरी घटना व्यंकटेशनगर येथे घडली. तेथील जुबेर इरफान बागवान( वय ३५ वर्ष, सध्या रा. व्यंकटेशनगर, इंदापूर, मूळ रा. वैराग, ता.बार्शी जि. सोलापूर) या इसमाने घराच्या छतावरील कॉलमच्या गजाला बेडशिटच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. त्याचे चुलत सासरे सादिक इब्राहिम बागवान (रा.व्यंकटेशनगर, इंदापूर) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.