इंदापूर : वार्ताहर बारामती तालुक्याचे सुपुत्र व इंदापूरचे जावई असलेल्या पोलिस निरीक्षक किरण सुरेश अडागळे यांना केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाई अंतर्गत कर्तव्य केल्याबद्दल " राज्य आंतरीक सुरक्षा सेवा पदक " देवून सन्मानीत केले आहे .
महाराष्ट्रातील अतिदुर्गम , अधिवासी गडचिरोली जिल्हा त्यातील कुरखेडा तालुक्यातील ग्यारापती पोलिस स्टेशन म्हणजे आंध्र प्रदेश , तेलगंणा , महाराष्ट्र अशा तीन राज्याची सिमा लगत असलेले ग्यारापती पोलिस स्टेशन आहे . आंध्रप्रदेश,तेलगंणा व महाराष्ट्रातील नक्षलवाद्यासाठी धनदाट अरण्य वास्तव्याचे व कारवाईचे प्रमुख ठिकाण आहे . या ठिकाणी सन २०१५ते २०१८ या काळात नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली नक्षलवादी विरोधी मोहिम , सी 60 पथकाचे काम केले. या काळात नक्षलवाद्या बरोबर अनेक छोटया मोठ्या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग होता . या काळात अनेक नक्षलवाद्याचे मन परिवर्तन करून त्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले , राजकीय निवडणूका कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडले .आठवडे बाजार सुरू केला. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले . सामजीक सलोखा , राष्ट्र प्रेम वाढीस लागावे म्हणून विविध कार्यक्रम घेतले . आदी कार्याची दखल पोलिस दलाचे पोलिस महासंचालक यांनी घेतली . त्यामुळे राष्ट्रपती पदकाच्या खालोखाल मानले जाणारे , भारत सरकार केंद्रीय गृह खाते मार्फत कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी यांना दरवर्षी दिले जाणारे सन्मानाचे " राज्य अंतरीक सुरक्षा सेवा पदक " पोलिस निरीक्षक किरण अडागळे यांना देवून सन्मानीत केले आहे .
इंदापूर येथील पत्रकार व अॅड . नारायण ढावरे यांचे पोलिस निरीक्षक किरण सुरेश अडागळे जावई आहेत. त्यांच्या कार्यकर्तत्वाचा इंदापूरकरांना अभिमान आहे .त्यामुळे इंदापूरकरांनी त्यांचे सोशल मिडीयावरून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .