वैभव पोरेंच्या कडून माणच्या पत्रकारांना एफएन - ९५ मास्कचे वाटप..!




▬▬▬▬▬▬▬▬
ग्रामीण महाराष्ट्र न्यूज
▬▬▬▬▬▬▬▬
म्हसवड - ता.माण येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे पुण्यात शिक्षक म्हणून कार्यरत असले तरी विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून माण तालुक्यात लाखों रूपयांची विकासकामे तसेच शैक्षणिक साहित्य , विद्यार्थ्यांना लाखों रूपयांची स्लिपिंग किट देत आपले मायभूमीवरील प्रेम त्यांनी दाखवून दिले आहे.आजही कोरोना परिस्थितीचा सामना करत जीव धोक्यात घालून कोरोना योध्दा म्हणून पत्रकारितेचे काम करत असलेल्या आपल्या पत्रकार बांधवांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून वैभव पोरे यांनी सामाजिक बांधीलकेतून एफएन ९५ चे मास्कचे वाटप केले.
  जगात कोरोना या संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला असून यामध्ये आरोग्य, पोलीस, यांचेबरोबर प्रसारमाध्यमेही कोरोना योध्दा म्हणून काम करत आहेत. बातमीसाठी पत्रकार मित्र ही रस्त्यावर उतरले आहेत.त्यांचेही या कोरोनाच्या महामारीतून संरक्षण व्हावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांनी माणमधील पत्रकारांना एफ एन ९५ मास्कचे त्यांचे बंधू सिध्देश्वर पोरे यांच्या हस्ते वाटप केले. यावेळी तालुक्यातील बहुतांश पत्रकार उपस्थित होते.
वैभव पोरे यांनी विविध संस्थाच्या माध्यमातून म्हसवड ता.माण येथील सिध्दनाथ हायस्कूल व प्राथमिक शाळेला भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने शाळांचे रूपडे पालटले आहे. निधीबरोबरच शैक्षणिक साहित्य ,संगणक रूम ,प्रयोगशाळा ,मुख्याध्यापक कक्ष ,विद्यार्थ्यांना स्लिपींग किट दिली आहेत.आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे रूपडे बदलण्यात वैभव पोरेंची महत्वाची भूमिका आहे.
   कोरोनाच्या या माहामारीत पत्रकार मित्रांची बाहेरगांवी असूनही वैभव पोरेंनी काळजी घेतल्याबद्दल पत्रकार संघाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

चौकट - पुण्यात विविध संस्था , संघटनाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या तालुक्यात निधी ,किट देण्याचा प्रयत्न केला.या सामाजिक कार्याची दखल घेत पत्रकार संघाने मला पुरस्कार देऊन माझा व कार्याचा सन्मान केला होता.आज हेच पत्रकार बांधव कोरोना परिस्थितीत रस्त्यावर उतरून काम करत आहे.त्यांनी केलेल्या सन्मानातून थोडफार उतराई होण्याची संधी मिळाली.म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण एफएन ९५ मास्कचे वितरण केले.
 - वैभव पोरे ,सामाजिक कार्यकर्ते म्हसवड

फोटो - म्हसवड ता.माण येथे वैभव पोरेंनी पत्रकारांना दिलेल्या एफएन -९५ चे मास्कचे वितरण करताना त्यांचे बंधू सिध्देश्वर पोरे व उपस्थित पत्रकार बांधव...