माडगुळे/ प्रतिनिधी: माडगुळेनजीक आटपाडी-सांगोला मार्गावर शनिवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान दुचाकी व पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात गोडसेवाडीचा तरुण पांडुरंग सुरेश गोडसे जागीच ठार झाला. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ फारच कमी होती. गोडसे हा तरुण आपल्या फॅशन होंडा दुचाकी (एमएच 13 एम 5629 ) गाडीवरून आपल्या सासरवाडी आटपाडीस जात होता.तो आपल्या लहान मुलांना काही खाऊ,चप्पल व नवीन कपडे घेऊन चालला होता. तो माडगुळे गावापासून थोडा पुढे गेला असता त्याचवेळी आटपाडीकडून डाळिंबाचे बॉक्स घेऊन पिकअप गाडी (क्रमांक एम एच 09 सी यु 4053) भरधाव वेगाने येत होती.थोडे वळण असल्यामुळे व दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे, दोघांनाही रस्त्याचा अंदाज न समजल्यामुळे ओव्हरटेक करताना होंडा गाडीची पिकअपच्या बाजूला जोरदार धडक बसली व त्यामुळे हा युवक रस्त्यावरच्या कडेला पडला. त्याच्या डोक्यावरील भागात धडक बसल्यामुळे त्याचा मेंदू रस्त्यावर जवळजवळ दहा फुटापर्यंत विखुरला गेला व रस्त्याच्या साईटवरून खोल खड्ड्यात पडला. काही लोकांनी पोलिस स्टेशनला फोन करून झालेल्या घटनेची बातमी सांगितल्यानंतर तात्काळ आटपाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांबळे घटनास्थळी हजर झाले.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.