व्यापारी गाळे, इमारती यांचे भाडे माफ करावे अशी मागणी



                 इंदापूर : वार्ताहर 

कोरोनामुळे आर्थिक दुरावस्थेत असणा-या नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषदेने इमारत, व्यापारी गाळ्यांचे भाडे माफ करावे. बखळ जागेची घरपट्टी कायमची माफ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांची गुरुवारी (दि.१८ जून) समक्ष भेट घेवून करण्यात आली.

       या मागणीसंदर्भात दि.४ जून रोजी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे जे विस्तृत निवेदन देण्यात आले होते. त्याची प्रत खा.सुळे यांना देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक अनिकेत वाघ, प्रा.अशोक मखरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी ही मागणी केली.