दादाना टोपीची अलर्जी का ?
टोपीचा राग राग कशासाठी?
म्हसवड : प्रतिनिधी:
पोलीस हा शब्द जरी आठवला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो एवढी ताकत या एका शब्दामध्ये आहे, पोलीस म्हटल की खाकी शर्ट, खाकी पँन्ट व डोक्यावर नियुक्तीप्रमाणे टोपी असेच चित्र सर्वसामांन्याच्या डोळ्यासमोर उभे राहते, मात्र आजकाल हे दृष्य जरा बदलल्यासारखे दिसत असुन सर्वच पोलीसांच्या अंगावर खाकी तर दिसतेच मात्र डोक्यावरील टोपी मात्र दिसत नाही याकडे वरिष्ठ अधिकारी ही फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने जवळपास सर्वच पोलीसांच्या डोक्यावरील टोप्या गायब झाल्या असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे पोलीसांना टोपी ची अँलर्जी तर नाही ना असा सवाल सर्वसामान्य नागरीकांतुन विचारला जात आहे.
सदरक्षणाय खलनिग्रनाय असे बिरुद असलेल्या पोलीस खात्याचा वेगळाच दरारा आहे, सामान्य जनतेच्या मनात तर या खात्याबद्दल खुपच आदर व आदरयुक्त भितीही असल्याचे दिसुन येते. पूर्वी पोलीस म्हटले की हाफ पँन्ट, हाफ शर्ट व डोक्यावर डार्क निळी टोपी व त्यामध्ये लाल अशी पट्टी असा एक विषेश पेहराव होता मात्र त्या पेहरावाचा सामान्य जनतेला खुपच आदर व हेवा वाटत होता तो पेहराव ज्याच्या अंगावर दिसायचा त्या व्यक्तीला समाजात वेगळाच सन्मान असायचा काळाच्या ओघात खरेतर सर्व काही बदलले त्यामुळे पोलीसांच्या पेहरावही बदलला पोलीसांची हाफ पँन्ट जावुन त्याजागी फुल पँन्ट आली त्यामुळे पोलीस अधिकच स्मार्ट दिसु लागले मात्र त्यांच्या स्मार्ट पणाला त्यांची टोपी जणु अडसरच ठरु लागली की काय म्हणुन अनेक पोलीस कर्मचार्यांनी डोक्यावरची टोपी खांद्यावर अडकवली तर अनेकजणांनी ती घालणेच बंद केले. खरे तर ही टोपीच पोलीसांची खरी ओळख आहे या टोपीमुळे ती घालणारी व्यक्ती ही कर्मचारी आहे की अधिकारी आहे हे सहज सामान्यांच्या लक्षात येते, मात्र सध्या ही टोपीच पोलीसांच्या डोक्यावरुन गायब झाल्याने समोरची व्यक्ती ही कर्मचारी आहे की अधिकारी आहे हेच समजत नाही, पोलीस स्टेशनमध्ये ही सहसा कोणी कर्मचारी टोपी परिधान केलेली दिसत नाही, विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचार्यांनासुध्दा त्यांच्या ड्रेस कोड मध्ये टोपीचा समावेश केला गेला आहे. पण त्यांच्यामध्ये ही या टोपीचा वापर दिसुन येत नाही जी टोपी पोलीसांची खरी ओळख आहे तीच सध्या गायब झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. पोलीस कर्मचारी म्हटले की त्याच्या डोक्यावर निळी - जांभळी गांधी टोपीप्रमाणे आकाराची लालसर पट्टी ची टोपी तर अधिकारी म्हटले की गोलाकार व पुढे निमुळती टोपी अशी टोपीची खरी ओळख आहे मात्र या टोपीमुळेच आपण कर्मचारी आहोत की अधिकारी आहोत हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येत असल्याने अनेक कर्मचार्यांनी ही टोपी घालणेच बंद केले आहे, याकडे वरिष्ठ अधिकारी सुध्दा दर्लक्ष करीत असल्यानेच बिनटोपीचे पोलीस जिल्ह्यात सर्वत्र आढळतात. जे पोलीस कर्मचारी न्यायालयात नेमनुकीस आहेत ते कर्मचारी फक्त कोर्टासमोर हजर राहताना डोक्यावर टोपी परिधान करताना दिसुन येतात तर बहतांशी वेळा अधिकारी वर्गही सहसा टोपी वापरताना दिसत नाही त्यामुळे पोलीस अधिकारीच टोपी वापरत नसल्याने कर्मचार्यांना बोलणार कोण असा प्रश्न उपस्थित होत असुन याकडे जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष देणार का ? असा सवाल सर्वसामान्य जनतेतुन विचारला जात आहे.
फोटो - संग्रहीत पोलीस टोपीचा फोटो लावणे.
